
शेतकरी मित्रांनो सोलापूरमध्ये कांद्याला ७ हजारांचा कमाल भाव मिळालाय. पण अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये काय भाव मिळतोय ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, २९ ऑक्टोबरच्या लिलावात राहुरी-वांबोरी बाजारात लाल कांद्याला सरासरी ४ हजार २०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला ३ हजार ८०० रुपये भाव मिळाला.
संगमनेरमध्ये लाल कांद्याला ३ हजार २०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला २ हजार ७५० रुपये भाव मिळाला. कोपरगावमध्ये लाल कांद्याला ३ हजार ५०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला ३ हजार ९०० रुपये भाव मिळाला. जामखेडमध्ये लोकल कांद्याला ३ हजार २५० रुपये भाव मिळाला.
शेवगावमध्ये पहिल्या प्रतीच्या कांद्याला ४ हजार ३००, दुसऱ्या प्रतीला ३ हजार २००, तर तिसऱ्या प्रतीला २ हजार रुपये भाव मिळाला. तर मग मंडळी, तुमच्या तुमच्या जवळच्या बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय ? कमेंट करून नक्की सांगा.





