Latest

अहिल्यानगरमध्ये डाळिंबाचा नवा रेकॉर्ड…; ‘या’ मार्केटमध्ये मिळाला ६९०० रुपयांचा रेट !

शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या डाळिंबाला जेव्हा विक्रमी भाव मिळतो, तेव्हा त्याच्या कष्टाचं चीज होत ! कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सुरेगावकर खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये बुधवारी तब्बल ३८० ते ४०० क्विंटल डाळिंबाची आवक झाली. सुलतानपूर येथील डाळिंब उत्पादक व्ही. डी. देशमुख यांच्या दर्जेदार मालाला तब्बल ३८५ रुपये किलो, म्हणजेच ६९०० रुपये उच्चांकी भाव मिळाला.

या बाजारात डाळिंबाला सरासरी ८० ते १३० रुपये किलो दर मिळत होता. मात्र, नंबर एकच्या दर्जेदार मालाला विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

विशेष म्हणजे, सुरेगावच्या या मार्केटमध्ये राज्यातील विविध भागांतून २५० ते ३०० किलोमीटर अंतर पार करून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत आहेत.

योग्य दर, सुविधा, सन्मानाची वागणूक आणि डिजिटल व्यवहारामुळे शेतकऱ्यांचा या बाजारपेठेवरील विश्वास वाढताना दिसतोय. देशमुख म्हणतात, “दुष्काळी परिस्थितीत मिळालेला हा भाव निश्चितच मोठा दिलासा देणारा आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button