Latest

भगवानबाबा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट…; चेअरमन अखेर पोलिसांच्या ताब्यात, ठेवीदारांचे पैसे परत मिळणार का ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटमधील कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठी घडामोड घडलीय. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि मल्टिस्टेटचा चेअरमन मयुर रंगनाथ वैद्य याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून ताब्यात घेतलंय.

या मल्टिस्टेटच्या संचालक आणि व्यवस्थापकांनी जास्त परताव्याचं आमिष दाखवून ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याचा आरोप आहे. मात्र, ठेवीदारांच्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली होती.

या प्रकरणी २०२५ मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शेवगाव, पाथर्डी आणि अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हे दाखल झाले.

याआधी दिनेश शिवनाथ वैद्य याला अटक करण्यात आली होती. आता चेअरमन मयुर वैद्य पोलिसांच्या ताब्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आता या तपासातून ठेवीदारांच्या पैशांबाबत काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button