
जामखेडमध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या पलंग दर्शनासाठी गर्दी जमली होती. याच गर्दीत नागरिकांचे खिसे कापणाऱ्या विनोद जाधवला पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने थेट लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर वार केला.
आता याचं प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहे नवीन अपडेट? सांगतो. पण, मंडळी १७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास नागेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली.
विनोदची पत्नी अर्चना आणि आई भामाबाई यांनीही पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मदतीला आलेले सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे आणि होमगार्ड विजय वांजुळकर यांनाही दुखापत झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणात विनोद जाधव, त्याची पत्नी आणि आईला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विनोदविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत, तर काही गुन्ह्यांत तो फरार असल्याची माहिती आहे.





