
शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारातून एक महत्त्वाची अपडेट समोर आलीये. या मार्केटमध्ये पुन्हा एकदा डाळिंबाच्या दरात सुधारणा झाली आहे.
राहता एपीएमसीमध्ये डाळिंबाला नेमका काय भाव मिळतोय ? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, १८ ऑक्टोबर रोजी बाजारात तब्बल ३००७ क्रेट डाळिंबाची आवक झाली. यात एक नंबरच्या डाळिंबाला प्रति क्रेट २०१ ते ३५५ रुपये भाव मिळाला.
दोन नंबरला १०१ ते २०० रुपये, तीन नंबरला ५१ ते १०० रुपये, तर चार नंबरच्या डाळिंबाला अवघे १० ते ५० रुपय भाव मिळाला. या मार्केटमध्ये डाळिंबासोबत ड्रॅगन फ्रूटची ६ क्रेट, सीताफळाची ५२, संत्र्यांची ४५, मोसंबीची २२ आणि पेरूची २२ क्रेट आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला किलोमागे ४० ते ६५ रुपये, सीताफळाला २५ ते ७३ रुपये, संत्र्याला ५ ते २७ रुपये, मोसंबीला ५ ते २५ रुपये, तर पेरूला ५२ रुपये किलो भाव मिळाला.





