Latest

एमपीएससीची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत… श्रीगोंद्यात खळबळ ! नेमक घडलं काय ?

मंडळी, श्रीगोंद्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. श्रीगोंदा शहरात एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंडळी, श्रीगोंदा शहरातील कन्या विद्यालय परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय मयुरी सुनील मखरे या तरुणीचा मृतदेह तिच्याचं खोलीत आढळला. मयुरी एका अभ्यासिकेतून एमपीएससी आणि पोलीस भरतीची तयारी करत होती.

रविवारी, १८ ऑक्टोबरला ती खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच खोलीमालकाने तिला खाली उतरवलं आणि उपचारासाठी डॉ. हिरडे यांच्याकडे नेलं. त्यानंतर रुग्णवाहिकेतून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पुढील तपास करत आहेत. मयुरीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिच्या मृत्यूमागचं सत्य तपासातूनच समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button