Latest

अहिल्यानगरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का ! खासदार निलेश लंकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे. अल्पसंख्यक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पक्षातील मनमानी कारभार, स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलणे आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित पाठबळ न मिळणे, अशी कारणे त्यांनी मांडली आहेत. खासदार निलेश लंके यांच्या कार्यपद्धतीवरही जरीवाला यांनी नाराजी व्यक्त केली.

मुस्लिम समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आणि विकासकामांसाठी अपेक्षित प्रयत्न झाले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. महानगरपालिका निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

काही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांशी तडजोड केल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील व्यक्तींना महत्त्व दिल्याने असंतोष वाढत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, हा निर्णय वैयक्तिक स्वार्थातून नसून कार्यकर्त्यांचा सन्मान आणि समाजाच्या प्रश्नांसाठी घेतल्याचे जरीवाला यांनी स्पष्ट केले. पद सोडलं, पण संघर्ष नाही—अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button