
अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आणि व्हॉइस चेअरमनची निवड प्रक्रिया बिनविरोध होईल का? नवनिर्वाचित संचालक मंडळाचा पहिलाच ठराव काय असणार ? याबाबत स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणालेत डॉक्टर सुजय विखे? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा. मंडळी, सुजय विखे पाटील म्हणाले की, नवीन संचालक मंडळाचा पहिला ठराव अहमदनगर जिल्हा बँकेचं नाव बदलून अहिल्यानगर सहकारी जिल्हा बँक करण्याचा असेल.
यावेळी त्यांनी निवडणुकीतील राजकीय वातावरणावरही भाष्य केलं. प्रचारादरम्यान कोणत्याही पॅनेलकडून आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. शेतकरी आणि ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी वक्तव्यं टाळण्याचा निर्णय सर्व नेत्यांनी पाळला, असं त्यांनी सांगितलं.
तसंच मतदान शांततेत पार पडत असून विजय-पराभव हा निवडणुकीचा भाग आहे. निकालानंतरही सर्व संचालकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर मग मंडळी तुमच्या मते अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचा चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन कोण होणार? कमेंट करून नक्की सांगा.





