
मोबाईल रिचार्जच्या वाढत्या खर्चामुळे तुम्हीही हैराण आहात का ? मग जिओच्या नावाने समोर आलेली ही ऑफर तुमचं लक्ष वेधून घेईल. कारण, अवघ्या एका रिचार्जमध्ये तीन वर्षे कॉलिंग, डेटा आणि एसएमएस मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. नेमका कसा आहे हा रिचार्ज प्लॅन? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, रिलायन्स जिओच्या या कथित स्पेशल प्लॅनची किंमत १० हजार रुपये असल्याचं वृत्त आहे. यामध्ये ३६ महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज अडीच जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजेच तीन वर्षांत तब्बल २ हजार ७३७.५ जीबी डेटा वापरता येईल.
याशिवाय रोमिंग आणि जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही मिळणार असल्याचा दावा आहे. मात्र, हा प्लॅन रिचार्ज करण्याआधी जिओच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवर त्याची उपलब्धता आणि अटी नक्की तपासा. तर मग मंडळी, तुम्ही १० हजार रुपये देऊन हा रिचार्ज कराल का? कमेंटमध्ये नक्की सांगा!





