Latest

संगमनेर ते पंढरपूर… दोन दिवस, ११ सायकलपटू आणि ३०० किलोमीटरची सायकल वारी !

विठ्ठलाच्या दर्शनासाठी काहीजण पायी वारी करतात, तर संगमनेरचे ११ सायकलपटू चक्क ३०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहेत ! भक्ती, जिद्द आणि आरोग्याचा हा अनोखा संकल्प नेमका कसा आहे? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, संगमनेर ते पंढरपूर अशी ही विशेष सायकल दिंडी ९ आणि १० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. भक्ती-शक्ती रायडर्सच्या वतीने या दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. डॉ. विश्वनाथ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या विठ्ठल मंदिरातून या दिंडीला सुरुवात होणार आहे.

विशेष म्हणजे, या प्रवासात ११ सायकलपटू सहभागी होणार असून, अवघ्या दोन दिवसांत ३०० किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. पहिल्या दिवशी करमाळा येथे मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूर गाठून विठुरायाचं दर्शन घेतलं जाणार आहे.

भक्तीसोबतच आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या सायकलपटूंच्या जिद्दीला सलाम! तर मग मंडळी, तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button