
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पण हा साठा पुढचे आठ महिने पुरणार का? उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार का? हेच महत्त्वाचं आहे. नेमकी परिस्थिती काय आहे ? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, ५ नोव्हेंबरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये ३४ हजार ४६१ दलघफू पाणी शिल्लक आहे. भंडारदरा धरणात ९१ टक्के, मुळा धरणात ६३ टक्के, तर निळवंडेमध्ये ६५ टक्के पाणीसाठा आहे.
दुसरीकडे आढळा धरण ९५ टक्के भरलेलं असलं, तरी सीना धरणात फक्त २७, मांडओहळमध्ये १६ आणि खैरी धरणात अवघा १२ टक्के साठा आहे.
विशेष म्हणजे भूजलपातळी तीन मीटरने खाली गेल्याने विहिरींनीही तळ गाठलाय. त्यामुळे पिण्याचं पाणी, रब्बी पिकं आणि जनावरांचा चारा यांचं नियोजन प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे. तर मग मंडळी तुमच्या गावात आतापासूनच पाणीटंचाई जाणवतेय का? कमेंट करून नक्की सांगा.





