
दिवाळीचा सण, सगळीकडे रोषणाई आणि आनंद… पण ज्यांचं घरदारच ऊसाच्या फडात आहे, अशा कष्टकरी कुटुंबांची दिवाळी कशी असते? हे जाणून घेण्यासाठी आमदार मोनिका राजळे थेट ऊसतोड कामगारांच्या पालावर पोहोचल्या. पण तिथे त्यांनी नेमकं काय केलं? सांगतो; मात्र त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील कामगारांच्या झोपड्यांना त्यांनी भेट दिली. फराळ वाटप केला, महिलांना साड्या भेट दिल्या आणि झोपडीत बसून चहापान करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि बालविवाहाचा मुद्दाही समोर आला.
मुलींचं लग्न १८ वर्षांपूर्वी करू नका, त्यांना उच्च शिक्षण द्या आणि स्वतःच्या पायावर उभं करा, असं भावनिक आवाहन राजळे यांनी केलं. दरम्यान, पाथर्डीत १०० आणि शेवगावमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर मग मंडळी, राजकारणापलीकडे जाऊन कष्टकऱ्यांसोबत साजरी केलेली ही दिवाळी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा !





