
एका जुन्या विहिरीत पाणी आटलं आणि गाळ काढताना असं काही सापडलं की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली! नेमकं प्रकरण काय ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, ही घटना आहे पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव रस्त्याची. भगवानगडाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीत दुष्काळामुळे पाणी आटलं होतं. त्यामुळे विहिरीतील गाळ काढण्याचं काम सुरू होतं.
मात्र, याच कामादरम्यान कामगारांना चक्क आठ दुचाकींचे सांगाडे आणि सुटे भाग आढळले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे अवशेष ताब्यात घेतले. प्राथमिक अंदाजानुसार या दुचाकी हिरो होंडा आणि बजाज कंपनीच्या असाव्यात.
या दुचाकी चोरीच्या असून पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीत टाकल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आता प्रश्न एवढाच, या आठ दुचाकी विहिरीत कोणी आणि कधी टाकल्या? तर मग मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा!





