Latest

सलमान खानच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! फक्त ११ रुपयांत पाहता येणार सिनेमा; काय आहे खास ऑफर?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमानचा आगामी ‘मातृभूमी : में वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून, त्याच्या ट्रेलरचे खास प्रदर्शनही करण्यात आले.यावेळी सलमानने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर जाहीर केली.

७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना हा चित्रपट अवघ्या ११ रुपयांत पाहता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ प्रेक्षकांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.या चित्रपटात लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांची कथा यात पाहायला मिळणार आहे.व्हीएफएक्सच्या कामामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला. आता हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button