
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण तुम्हाला माहितीये का, जगात असा एक साप आहे, जो अनेक वर्ष जगू शकतो! विशेष म्हणजे, त्याचं आयुष्य माणसालाही थक्क करणारं आहे. कोणता आहे हा साप? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी या सापाचं नाव आहे बोआ कॉन्स्ट्रिक्टर. हा साप विषारी नसतो. अनुकूल वातावरण आणि योग्य आहार मिळाल्यास तो सुमारे ४० वर्षांपर्यंत जगू शकतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आपला नाग किती वर्ष जगतो? तर कोब्रा नागाचं सरासरी आयुष्य चांगल्या वातावरणात साधारण २५ ते ३० वर्षांपर्यंत असू शकतं.
मात्र, प्रत्येक सापाचं आयुष्य त्याची प्रजाती, आहार, अनुवंशिक गुणधर्म आणि राहण्याच्या वातावरणावर अवलंबून असतं. म्हणजेच, सापांचं जगही आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी वेगळं आणि रंजक आहे! तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.





