
राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र आता पावसाबाबत दिलासादायक अंदाज समोर आला आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो विदर्भातून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पुढे कोकणाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रासाठीही महत्त्वाची बातमी आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः १३ आणि १४ सप्टेंबरला नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. १२ ते १७ सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.





