Latest

श्रीरामपुरात आजोबांसह नातूही निवडणुकीच्या रिंगणात…. ससाणेंसमोर मुरकुटे यांचे उमेदवार ! कोण घेणार माघार ?

श्रीरामपूरातून ज्यांना बिनविरोध निवडून देण्याची चर्चा होती, त्यांच्यासमोर आता मुरकुटेंचेच उमेदवार उभे ठाकल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी श्रीरामपुरात अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या.

नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सेवा संस्था आणि ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ओबीसी मतदारसंघातून माजी आमदार भानुदास मुरकुटे, त्यांचे नातू नीरज मुरकुटे आणि रणजित बनकर यांनीही अर्ज दाखल केले.

तर सेवा संस्था मतदारसंघातून ससाणेंसोबत मुरकुटे समर्थक सोन्याबापू शिंदे आणि सोपान राऊत मैदानात आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची ससाणेंना बिनविरोध पाठिंबा देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे.

डॉ. सुजय विखे यांनीही समर्थकांची बैठक घेऊन उमेदवारी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र मुरकुटेंच्या उमेदवारीमुळे आता ससाणे-मुरकुटे युतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता नेमक कोण माघार घेणार ? आणि निवडणुक बिनविरोध होणार का? हाच सवाल उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button