Latest

सांगली, कोल्हापूरला उसाचा दर ४२०० रुपयांवर अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना किती मिळतोय भाव ! ऊसदरावरून कारखानदार अडचणीत?

ऊस पिकवणारा शेतकरी अहिल्यानगरचा आणि साखर कारखानेही जिल्ह्यातलेच, मग ऊसदरात एवढी तफावत का? कोल्हापूर आणि सांगलीत ४२०० रुपये दर मिळत असताना अहिल्यानगरमध्ये मात्र शेतकऱ्यांना कमी दर मिळतोय. नेमकं कारण काय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या जोरावर ४२०० रुपये प्रतिटन ऊसदर मिळवला आहे. तर अहिल्यानगरमधील कारखानदारांनी यंदासाठी ३१०० ते ३२०० रुपये दर जाहीर केला आहे. म्हणजेच प्रतिटन जवळपास एक हजार रुपयांची तफावत आहे.

कारखानदारांकडून साखर उतारा कमी झाल्याचं कारण पुढे केलं जात होतं. मात्र, आकडेवारी वेगळीच गोष्ट सांगतेय. भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले कारखान्याचा उतारा मागील वर्षाच्या तुलनेत वाढल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे शेतकरी नेते सुरेश ताके यांनी कारखानदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आता ऊसदराचा हा तिढा कधी सुटणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button