Latest

एका क्षणात झालं होत्याच नव्हतं… शेवगाव-तिसगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर दुचाकीला धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-तिसगाव रस्त्यावर एका भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, शेवगाव तालुक्यातील वृद्धेश्वर कारखान्याजवळ पेट्रोल पंपासमोर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय अण्णा फुलारी आणि संतोष माणिक खवले हे दोघे नातेवाईक दुचाकीवरून कासार पिंपळगावला घरी जात होते. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात २८ वर्षीय अक्षय फुलारी याचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष खवले गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. चालकाचा शोध घेण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी शेवगाव-तिसगाव रस्त्यावर रास्ता रोको केला. पोलिसांनी तपासाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. तर मग मंडळी, तुम्हाला या दुर्दैवी घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button