Latest

अहिल्यानगरच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, जिल्ह्यातील किती नावे?

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता म्हणजेच ओटीएस योजनेची २६ हजार ७०३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे.

या योजनेत शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत भरायची आहे. त्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.

ही रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत आहे. यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहे. मात्र आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण असणं आवश्यक आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ४३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची १ हजार ३६९ कोटी रुपयांची कर्जमुक्ती झाली आहे. तर मग मंडळी, तुमचं नाव या यादीत आहे का? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button