Latest

…तर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही, त्यांना सावकाराच्या दारात जावे लागेल ! डॉक्टर सुजय विखे पाटील असं का म्हणालेत ?

जिल्हा बँकेची आरबीआयकडे तक्रार केली, तर त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसू शकतो, असा इशारा नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलाय. नेमकं काय म्हणालेत डॉक्टर सुजय विखे पाटील? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत आरबीआयकडे तक्रार झाल्यास बँकेवर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे बँकेचा कारभार अडचणीत येईल आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणंही कठीण होईल.

परिणामी, शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांच्या दारात जावं लागेल. तक्रारींमुळे बँक अडचणीत आली, तर त्याची माहिती सभासदांना देऊ, असंही डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणालेत.

दरम्यान, बँकेच्या आर्थिक हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कर्जवसुलीचा प्रश्न मार्गी लावण्यासोबतच पीककर्जाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना कोणती कर्जे देता येतील, यावर विचार सुरू आहे. तर मग मंडळी तुम्हाला नवनिर्वाचित अध्यक्षांकडून कोणकोणत्या अपेक्षा आहेत कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button