Latest

पोलीस भरतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! नवा नियम काय सांगतो ?

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल झालाय. नेमका काय आहे नवा बदल? सांगतो.

आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी नव्या बदलानुसार, शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर संबंधित उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळू शकणार आहे.

मासिक पाळीदरम्यान अनेक तरुणींना पोटदुखी, अशक्तपणा आणि थकव्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत धावण्यासारख्या कठीण शारीरिक चाचण्या देताना त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी पूर्ण करण्यासाठी ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ मिळू शकते.

मात्र, यासाठी संबंधित तरुणीची आरोग्य तपासणी केली जाणार असून, त्यानंतरच मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. म्हणजेच मासिक पाळीमुळे मेहनतीवर पाणी पडण्याची भीती आता कमी होणार आहे. तर मग मंडळी, तुम्हाला हा नवा निर्णय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button