
घर बांधताय मग आजचा व्हिडीओ तुमच्यासाठीचं आहे. मंडळी, अनेकजण सिमेंटलाही एक्सपायरी डेट असते का ? असा प्रश्न विचारतात. पण खरंच असं असत का? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, सिमेंट खराब असेल, तर तुमच्या घराच्या मजबुतीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिमेंट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिमेंटच्या पिशवीवरची उत्पादन तारीख तपासा. खाद्यपदार्थांप्रमाणे सिमेंटवर एक्सपायरी डेट असेलच असं नाही. मात्र, उत्पादनानंतर किती काळ झाला आहे, हे पाहणं आवश्यक आहे.
साधारणपणे सिमेंट उत्पादनाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण ९० दिवस उलटले म्हणजे सिमेंट आपोआप खराब होतं, असं नाही. त्याची गुणवत्ता योग्य चाचण्यांद्वारे तपासावी लागते.
सिमेंट खरेदी करताना पिशवी फाटलेली नाही ना, सिमेंटला ओलावा लागलेला नाही ना आणि त्यात गुठळ्या तयार झाल्या आहेत का, हेही तपासा. सिमेंट नेहमी कोरड्या जागी साठवा. तर मग मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा.





