Latest

महिन्याला किती तेल वापरणं योग्य? तज्ज्ञांनी सांगितलं सोपं गणित

“तुमच्या घरात महिन्याला ५ ते ६ लिटर तेल संपतंय? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे!”

भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण जास्त तेल खाणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, वजन वाढणं, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यामागे तेलाचं जास्त प्रमाण हेही एक मोठं कारण मानलं जातं.

आरोग्य तज्ज्ञ आणि Indian Council of Medical Research यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका व्यक्तीसाठी दिवसाला फक्त 15 ते 20 ml म्हणजे 3 ते 4 चमचे तेल पुरेसं असतं. म्हणजेच महिन्याला साधारण अर्धा लिटर तेल.

जर घरात 4 सदस्य असतील, तर संपूर्ण कुटुंबासाठी महिन्याला फक्त 2 लिटर तेल पुरेसं मानलं जातं. यापेक्षा जास्त तेल वापरलं जात असेल, तर ते आरोग्यासाठी धोक्याचं संकेत असू शकतं.

तज्ज्ञ सांगतात, Non-stick pan, उकडलेले पदार्थ, Air Fryer आणि baking वापरल्यास तेलाचं प्रमाण कमी करता येतं. तसेच एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरणं टाळणंही खूप गरजेचं आहे. मंडळी, लक्षात ठेवा… पदार्थाची खरी चव जास्त तेलात नाही, तर योग्य स्वयंपाकात असते !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button