
रेशन कार्डधारकांनो, तुम्हाला दर महिन्याला किती तांदूळ आणि किती गहू मिळायला हवा, हे माहिती आहे का? कारण प्रत्येक रेशन कार्डधारकाला मिळणारं धान्य सारखं नसतं. नेमका हिशोब सांगतो? पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दर महिन्याला एकूण ३५ किलो धान्य दिलं जातं. यामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गव्हाचा समावेश असतो. तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक सदस्यामागे ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू दिला जातो.
म्हणजेच कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार मिळणाऱ्या धान्याचं प्रमाण ठरतं. दरम्यान, काही ग्रामीण भागांत रेशनचा तांदूळ १० ते १२ रुपये किलोने विकत घेतला जात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. काही ठिकाणी तांदळाच्या बदल्यात ज्वारी किंवा बाजरीही दिली जाते.
मात्र, रेशनचं धान्य विकण्यापूर्वी नियम आणि पात्रता समजून घ्या. तर मग मंडळी, तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळतं, कमेंटमध्ये नक्की सांगा!





