Latest

रात्री घरातून निघाला, पण पुन्हा परतलाच नाही….; रात्रभर पाण्यावर तरंगत राहिला मृतदेह ! श्रीरामपूरात नेमक काय घडलं ?

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ऋषिकेश नामदेव कांबळे या तरुणाचा पाटचारी क्रमांक १६ मधील वाहत्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवार, २३ सप्टेंबरच्या रात्री ऋषिकेश पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

गुरुवारी सकाळी सुमारे आठ वाजता एका वाटसरूला पाण्यात मृतदेह दिसला. त्याने शेतकऱ्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

सध्या भंडारा जलाशयातून शेतीसाठी पाटचारी क्रमांक १६ मध्ये पाण्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे मृतदेह पाण्याखाली असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे कठीण झाले.

घटनास्थळाजवळच ऋषिकेशची वस्ती असल्याने त्याचे वडील नामदेव कांबळे यांनी मृतदेहाची ओळख पटवली. रात्री दुचाकीवरून जाताना नियंत्रण सुटल्याने तो पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठवला. त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेशच्या पश्चात वडील, भाऊ, चुलते, चुलत भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button