Latest

सरकार मराठा तरुणांना बिजनेसमॅन बनवणार ! मराठा समाजाला फडणवीस सरकारकडून 150 कोटी रुपयांचं गिफ्ट !

मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे! मुख्यमंत्री यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी तब्बल 750 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठा आधार ठरणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज, आर्थिक मदत आणि विविध योजना महामंडळामार्फत दिल्या जातात.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे 2026 पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आता एकीकडे आंदोलनाची तयारी आणि दुसरीकडे 150 कोटींचा निधी… त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि मराठा समाजात मोठी चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button