
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मोठा साखर कारखाना शेतकऱ्यांना प्रति टन दोनशे रुपयांचे विशेष अनुदान देणार आहे. कोणता कारखाना हे अनुदान देणार ? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २०० रुपयांचे विशेष अनुदान देण्याची घोषणा केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ही घोषणा केली.
यावेळी थोरात यांनी यंदाचा दुष्काळ हे कोरोना महामारीसारखेच मोठे संकट असल्याचे सांगितले. मात्र, काटकसर, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर या संकटावर मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे कारखान्याची प्रतिदिन नऊ हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता करण्याचे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या हंगामात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पण, दोनशे रुपयांच हे अनुदान शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार का? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा.





