
काष्टीच्या साईसेवा पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. काय आहे हे नवीन अपडेट? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी श्रीगोंद्यातील या पतसंस्थेत तब्बल ६९ कोटी १९ लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. आता या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण, याची चौकशी होणार आहे.
राज्याच्या सहकार अपर निबंधकांच्या आदेशानुसार, नगरचे उपनिबंधक प्रशांत सातपुते यांची चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. सहकार कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत ही कारवाई सुरू झाली आहे. त्यातच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संस्थेचं दप्तर जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झालीय.
आता कर्जवाटप, ठेवी, आर्थिक व्यवहार आणि लेखापुस्तकांची तपासणी होणार आहे. पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापकांची भूमिका यातून स्पष्ट होईल. दरम्यान, शिवाजी खोमणे यांनी २४ ऑक्टोबरपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करण्याची मागणी केलीय. मुदतीत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय.





