
मित्रांनो, स्वतःची जमीन आहे, प्लॉट आहे आणि त्यावर घर बांधायचंय ? तर तुमच्यासाठी एक अपडेट आहे. महाराष्ट्रात आता जमिनीच्या अकृषिक म्हणजेच NA परवानगीची स्वतंत्र प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. पण थांबा, याचा अर्थ सगळे नियम संपले असा अजिबात नाही ! मग कसे आहेत नवे नियम ? सगळं सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
नव्या नियमानुसार, संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून विकास किंवा बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतर स्वतंत्र NA परवानगी घेण्याची गरज राहिलेली नाही.
विशेष म्हणजे, याचा फायदा फक्त नवीन प्लॉटधारकांनाच नाही, तर यापूर्वी बांधकाम किंवा रेखांकनाची मंजुरी घेतलेल्या जमीनधारकांनाही होऊ शकतो. अशा जुन्या प्रकरणांमध्ये विहित मुदतीत एकरकमी रूपांतरण अधिमूल्य भरून पुढील वार्षिक अकृषिक आकारणीतून दिलासा मिळवण्याचा पर्याय आहे.
मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्ग-दोनच्या जमिनी, इनाम किंवा कूळ कायद्याशी संबंधित जमिनींना ही सरसकट सूट नाही. अशा जमिनींसाठी आवश्यक पूर्वपरवानगी आणि लागू शुल्क भरावेच लागेल. तर मग मंडळी तुम्हाला शासनाचा नवा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.





