
अहिल्यानगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयात अधीक्षक म्हणून काम करणारे राजवर्धन उर्फ भाऊसाहेब दत्तात्रय पांडुळे यांचा हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी भाऊसाहेब पांडुळे हे ५० वर्षांचे होते. ते सारसनगर परिसरात राहत होते. १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी त्यांनी केडगाव बायपास चौकातील एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी इंटरकॉम आणि मोबाईलवर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून पाहिल्यावर ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. या घटनेमागे नेमकं काय कारण असावं, याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.





