Latest

संगमनेरकरांसाठी खूशखबर ! ‘या’ रस्त्यांच्या कामासाठी १० कोटींचा निधी मंजूर, आमदार तांबे यांचा पाठपुरावा यशस्वी

संगमनेरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी! शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने आता मोठं पाऊल पडलंय. आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश आलं असून, रस्ते विकासासाठी तब्बल १० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पण नेमका कोणता रस्ता विकसित होणार?

मंडळी, संगमनेर बसस्थानकापासून पीडब्ल्यूडी कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि दिल्ली नाकामार्गे थेट प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा या निधीतून विकास केला जाणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक ७१ वरील हा मार्ग शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे.

या कामात केवळ डांबरीकरणच नाही, तर रस्त्याचं रुंदीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि विविध युटिलिटी लाईन्सची कामंही केली जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत मिळेल.

या प्रकल्पासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत तांबे यांनी प्रयत्न केले. आता या निधीमुळे संगमनेरच्या रस्ते विकासाला किती गती मिळते, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button