Latest

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : डाळिंबाचा भाव कडाडला ! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये किलोला थेट 255 रुपयांचा रेट

डाळिंब उत्पादकांसाठी बाजारातून मोठी खुशखबर हाती आली आहे ! अहिल्यानगर जिल्ह्यात डाळिंबाच्या दराने थेट २५५ रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला मिळालेला हा भाव शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरतोय.

मंडळी, गुरुवारी राहाता बाजार समितीत डाळिंबाची तब्बल ८ हजार ४९६ कॅरेट आवक झाली. यामध्ये नंबर १ दर्जाच्या डाळिंबाला १६१ ते तब्बल २५५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.

नंबर २ डाळिंबासाठी १०१ ते १६० रुपये, तर नंबर ३ साठी ५१ ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. नंबर ४ डाळिंबाला १० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.

दरम्यान, बाजार समितीत ड्रॅगन फ्रूटलाही सरासरी ८० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. बाजारातील हे दर सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिले आहेत. चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाला मिळालेला २५५ रुपयांचा भाव उत्पादकांसाठी नक्कीच आशादायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button