Latest

अखेर उच्चांकापेक्षा सोने स्वस्त, युद्धाचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल

इराण-अमेरिका संघर्षामुळे भारतात सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारात अस्थिरता वाढली. सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली आणि अनेकांनी स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी नागरिकांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क थेट 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवले.

आता जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची, तर चांदीत 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचा भाव 1 लाख 62 हजार 225 रुपये, तर चांदीचा भाव 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर पोहोचला आहे.

आज गुरुपुष्यामृत योग असल्याने ग्राहकांची खरेदी वाढली, पण वाढलेल्या दरामुळे अनेकांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button