
नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. जिल्हा प्रशासन आणि लष्करामध्ये सामंजस्य करार झालाय… पण आता याच कामावरुन श्रेयवाद सुरु झाला आहे. खा. निलेश लंके यांनी दावा केलाय की, त्यांनीच या भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी पाठपुरावा केला.
पत्रव्यवहाराची कागदपत्रेही त्यांनी दाखवली.पण… श्रेयवादाच्या लढाईत कागदपत्रं काय सांगतात? घटनाक्रम पाहिला तर, ६ मार्च २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे या संदर्भात लेखी पत्रव्यवहार केला होता.
इतकंच नाही तर २३ मे २०२६ ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी डिफेन्स क्लस्टरच्या उद्घाटनावेळी थेट संरक्षणमंत्र्यांसमोर हा प्रश्न पुन्हा ठामपणे मांडला.यानंतरच केंद्रात हालचाली वाढल्या. परवानग्या मिळाल्या आणि अखेर जिल्हा प्रशासन व लष्कर यांच्यात हा ऐतिहासिक करार झाला, असं विखे समर्थकांचं म्हणणं आहे.
हा प्रश्न केवळ निवेदनापुरता न ठेवता विखे पिता-पुत्रांनी तो थेट मंजुरीपर्यंत पोहोचवला.ऐतिहासिक वारशासाठी हा मोठा निर्णय आहे, त्यामुळे आता श्रेयवादापेक्षा प्रत्यक्ष काम सुरू होणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा!





