Latest

कामाख्या ते निंबळक….; यंदा इतिहास घडणार ! कामाख्या देवी आणि त्रिपुरा सुंदरी या दोन शक्तीपीठांची ‘पवित्र ज्योत’ येणार अहिल्यानगरात

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये यंदा एक अनोखा धार्मिक सोहळा रंगणार आहे! नगर तालुक्यातील निंबळक येथे यंदा कामाख्या देवी आणि त्रिपुरा सुंदरी या दोन शक्तीपीठांच्या संयुक्त अग्निज्योतीचे आगमन होणार आहे.

शिवप्रहार संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि ज्योतिष तज्ज्ञ संतोष घोलप यांच्या संकल्पनेतून हा विशेष नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुवाहाटीच्या प्रसिद्ध कामाख्या मंदिरात दोन्ही शक्तीपीठांच्या अग्निज्योतींचा पवित्र संयोग घडवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयघोषात संतोष घोलप यांच्या हस्ते ही संयुक्त ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

यावेळी अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आली. आता ही पवित्र संयुक्त अग्निज्योत निंबळक येथे आणली जाणार असून, भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button