Latest

गॅस सिलेंडरपासून आधार कार्डपर्यंत… १ डिसेंबरपासून बदलणार हे ८ नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार ?

गॅस सिलेंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंत… डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून काही महत्त्वाचे आर्थिक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन खर्चावर होऊ शकतो. नेमके कसे आहेत हे बदल? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी यातील पहिला बदल म्हणजे SBI क्रेडिट कार्डवर मोठ्या रकमेच्या इंधन आणि वाहतूक व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

दुसरीकडे, २ ते ४ डिसेंबरदरम्यान RBI ची पतधोरण बैठक होणार आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या EMI आणि FD व्याजदरांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

कमोडिटी ट्रेडिंगसाठी SEBI चे नवे मार्जिन नियमही लागू होणार आहेत. आधार कार्डधारकांना मोठा दिलासा म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत आधारमधील ईमेल अपडेट मोफत करता येणार आहे.

NRI आणि OCI गुंतवणूकदारांना रिमोट KYC ची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, १ डिसेंबरला LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जाणार आहे.

तर पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक आहे. तर मग मंडळी तुम्हाला यातील कोणता बदल महत्त्वाचा वाटतो? कमेंट करून नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button