Latest

अखेर कर्जमाफीची वेळ ठरली ! मुख्यंमत्री फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर कर्जमाफीची वेळ ठरली असल्याची घोषणा करण्यात आली आहे.. मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी येथून मोठं विधान केलं आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देणं ही केवळ घोषणा नसून आमची बांधिलकी आहे, असं स्पष्ट सांगत त्यांनी खरिप हंगामापूर्वी कर्जमाफी केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा देखील मांडला.

जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही, तर पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज देण्याचा शासनाचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता आहे.

मंडळी, कर्जमाफीचा निर्णय हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतो. पण आता प्रत्यक्षात ही अंमलबजावणी कशी होते, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण कर्जमाफीसोबतच वीज सवलतीची घोषणाही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरू शकते.

म्हणूनच ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडीओ शेअर करा, लाईक करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button