
वडिलांनी मृत्युपत्र केलं नसेल, तर त्यांच्या संपत्तीवर मुलाचाच पहिला हक्क असतो, असा तुमचाही समज आहे का? थांबा… कायदा वेगळं चित्र सांगतो!
हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, वडिलांचा मृत्युपत्राशिवाय मृत्यू झाल्यास त्यांच्या संपत्तीचे वारस ठराविक नियमांनुसार निश्चित होतात. मुलगा आणि मुलगी दोघेही Class-I वारस असू शकतात. पत्नी आणि वडिलांची आई हयात असल्यास त्यांचाही वारसांमध्ये समावेश होतो.
उदाहरणार्थ, वडिलांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर साधारणपणे तिघांनाही समान हिस्सा मिळतो. वडिलांची आई हयात असल्यास वाटा पुन्हा बदलतो.
महत्त्वाचं म्हणजे, लग्न झालं म्हणून मुलीचा वारसाहक्क संपत नाही. वडिलोपार्जित किंवा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेत तर मुलीच्या हक्कासाठी वेगळे नियम लागू होऊ शकतात.
म्हणूनच संपत्तीचा प्रकार, कुटुंबातील वारस आणि आधीची कायदेशीर वाटणी तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.





