Latest

विखे-थोरात एकत्र आल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार…माजी मंत्री शंकरराव गडाखांचं मोठं विधान !

विखे आणि थोरात यांच्या राजकीय संघर्षाला ब्रेक लागला, अन् याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे. नेमके काय म्हणालेत गडाख? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, दिवाळीनिमित्त नेवासा तालुक्यातील चांदा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात हजारो शेतकऱ्यांसमोर गडाख यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आणि पाणीप्रश्नावर भाष्य केलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात एकत्र येतील, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती.

मात्र, यशवंतराव गडाख यांच्या पुढाकारातून समन्वय घडला आणि सहकारातील संघर्ष कमी झाला. या एकजुटीचा फायदा सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना होईल, असं त्यांनी म्हटलं.

दुसरीकडे, नेवाशातील पाणीप्रश्नावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. मुळा धरणाच्या एका आवर्तनात जवळपास आठ टीएमसी पाणी खर्च झालं असून, उर्वरित पाण्याचं योग्य नियोजन झालं नाही तर गावागावांत जनजागृती, दिंडी आणि दुष्काळी परिषद घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. तर मग मंडळी तुम्हाला गडाख यांचे विधान पटतंय का कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button