
“२०२६ मध्ये अंदाज चुकला, राज्यात दुष्काळ पडणार” अस पंजाबराव डख यांनी म्हटलंय. सुरवातीला दुष्काळ नाही असं म्हणणारें पंजाबराव आता मात्र परिस्थिती वेगळी दिसत असल्याने युटर्न घेतांना दिसताय. म्हणून त्यांच्या जुन्या अंदाजावरून सोशल मीडियातून सवाल उपस्थित होत आहेत.
दरम्यान गणेशोत्सवात धोधो पाऊस पडेल, असा त्यांचा ठाम अंदाजही अनेक भागांत फोल ठरल्याने टीका होत आहे. विशेष म्हणजे, “पाऊस आला नाही तर अंदाज सांगणं सोडून देईन,” असंही त्यांनी म्हटलं होतं. हवामानाचा अंदाज चुकू शकतो, हे मान्य.
पण शेतकरी या अंदाजावर पेरणीपासून काढणीपर्यंत अनेक निर्णय घेतो. त्यामुळे अंदाज किती ठामपणे सांगितला जातो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
“माफ करा, २०२६ मध्ये अंदाज चुकला, राज्यात दुष्काळ पडणार” हे वक्तव्य आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पंजाबराव डख यांचा अंदाज चुकला… मग आता त्यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवायचा तरी किती?





