Latest

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यांतील शेतकऱ्यांना जुन कर्ज फेडता आलं नाही, तरी नवीन कर्ज मिळणार…! नगरच्या कोणत्या तालुक्यांना लाभ ? यादी पहा…

दुष्काळामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील खरीप २०२६ च्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यामुळे जुन्या कर्जाची परतफेड करता आली नाही, तरी पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच पीककर्ज वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. बँकांना ही प्रक्रिया ३० एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

म्हणजेच याचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वचं १४ तालुक्यांना लाभ मिळणार आहे. मात्र, नव्याने दुष्काळी यादीत समाविष्ट केलेल्या ४३ तालुक्यांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पंचनाम्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. दुसरीकडे, उत्सव साधेपणाने साजरे करून बचत दुष्काळग्रस्तांना द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button