
दिवाळीत नवीन कपडे आणि फटाके मिळाले नाहीत, पण या चिमुरड्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं, याची कल्पनाही कुटुंबाला आली नाही… ही घटना आहे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील. संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ही बातमी आहे. नेमक काय घडलं? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, १३ वर्षीय भैय्या पवार याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडील मजुरी करून घर चालवत होते. त्यातच कुटुंबाने कष्टाने साठवलेले पाच लाख रुपये एका पतसंस्थेत बुडाल्याने आर्थिक संकट अधिकच गंभीर झालं होतं.
८ नोव्हेंबरला आई कामावरून घरी परतली. दुपारी घराबाहेर आल्यानंतर तिला मुलगा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. नातेवाइकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे काष्टी परिसरात शोककळा पसरली आहे.
मात्र, एका निष्पाप बालकाच्या मृत्यूमागील नेमकी कारणं तपासातूनच स्पष्ट होतील. तर मग मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





