
“कार घेण्याचा प्लॅन आहे ? मग आजचा व्हिडीओ तुमच्यासाठीच. मंडळी इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम एलपीजी गॅस, पेट्रोल-डिझेलवरचं नाही तर आता यामुळे वाहनांच्या किमती सुद्धा वाढणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात तुमच्या आवडत्या मारुती कारसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात !”
मंडळी, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांवरही दिसू लागला आहे. आधी पेट्रोल-डिझेल आणि नैसर्गिक वायूचे दर वाढले, आणि आता वाहन उद्योगालाही या संकटाची झळ बसत आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki आपल्या अनेक कार मॉडेल्सच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीने स्पष्ट सांगितले की उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्यामुळे किंमत वाढ अपरिहार्य झाली आहे. विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांच्या आवडीच्या WagonR, Swift आणि Celerio सारख्या गाड्यांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
काही मॉडेल्सच्या किंमतीत ५ हजारांपासून तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागड्या कारवर अधिक वाढ होऊ शकते, तर एंट्री लेव्हल कारसाठीही अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. नव्या किंमती जूनच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे.





