
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाचं सावट असतानाच आता पशुपालकांसमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातील चाऱ्याची एक आकडेवारी समोर आली आहे. कशी आहे आकडेवारी? सांगतो पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी अहिल्यानगर, पारनेर, जामखेड आणि पाथर्डी या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये चाराटंचाईची चिंता अधिक वाढली आहे.
आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यातील पशुधनाला दररोज तब्बल २९ हजार ८४१ टन चारा लागतो. म्हणजेच महिन्याला जवळपास ९ लाख टन चाऱ्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात ७ लाख ४० हजार टनांहून अधिक मुरघास, ३ लाख ८३ हजार टन हिरवा चारा आणि ९ लाख ५९ हजार टनांहून अधिक वाळलेला चारा उपलब्ध आहे.
म्हणजे जिल्ह्यात जनावरांसाठी उपलब्ध असलेला चारा पुढचे दोन ते तीन महिनेच पुरेल, अशी परिस्थिती आहे. मात्र, हा साठा प्रत्यक्षात किती दिवस पुरणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चारा निर्मिती आणि निकृष्ट चारा सकस करण्यासारख्या उपाययोजनांचं नियोजन सुरू आहे. पण, चाराटंचाईवर मात करण्यासाठी सरकारने आणखी कोणते उपाय करायला हवेत? कमेंटमध्ये नक्की सांगा!





