Latest

अहिल्यानगरमध्ये आयपीएलच्या धर्तीवर रंगणार क्रिकेटचा थरार… विजेत्या संघाला मिळणार इतकं बक्षीस !

अहिल्यानगर शहरात क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी येणार आहे. शहरात लवकरच क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार असून यंदाच्या स्पर्धेत आयपीएलसारखं नियोजन करण्यात आलं आहे.

मंडळी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव स्वर्गीय संजय बोरा यांच्या स्मरणार्थ ‘विजेता क्रिकेट लीग’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते २० डिसेंबरदरम्यान वाडिया पार्क मैदानावर हे डे-नाईट सामने रंगणार आहेत.

या स्पर्धेत विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि भव्य करंडक, तर उपविजेत्या संघाला ७१ हजार रुपये आणि करंडक देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, यंदा या स्पर्धेत आयपीएलच्या धर्तीवर डीआरएस रिव्ह्यू सिस्टीम, इम्पॅक्ट प्लेअर आणि थर्ड अंपायर यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेचे माहितीपत्रक आणि प्रवेश अर्ज उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते श्री विशाल गणपतीच्या चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी संगमनाथ महाराज, अशोकबाबू बोरा आणि विजेता क्रिकेट क्लबचे सदस्य उपस्थित होते. आता अहिल्यानगरच्या मैदानावर कोणता संघ बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button