Latest

फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने नेलं, बाहेरून कडी लावली अन् मग २० वर्षीय तरुणीसोबत नको ते घडलं ! अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगरमध्ये २० वर्षीय तरुणीवरील अत्याचाराच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीला एका अपार्टमेंटमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर जे घडलं, त्याप्रकरणी आता दोघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी कौस्तुभ सागर आंबेकर याने तरुणीला फ्लॅट पाहण्यासाठी जायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिला अहिल्यानगर कॉलेज परिसरातून तपोवन रोडवरील कृष्णा अपार्टमेंटमध्ये नेण्यात आलं. यावेळी तेजस गंगाधर वारुळे याने फ्लॅटला बाहेरून कडी लावून निघून गेल्याचा आरोप आहे.

फ्लॅटमध्ये तरुणी एकटी असताना कौस्तुभने लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. विरोध केल्यानंतर धमकी दिल्याचाही उल्लेख आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात कौस्तुभ आंबेकर आणि तेजस वारुळे यांच्याविरोधात अत्याचार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button