Latest

दसऱ्याआधीच शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… अहिल्यानगरमध्ये कांदा बाजारभावात मोठी वाढ, ‘या’ मार्केटमध्ये मिळाला विक्रमी दर

राहाता बाजार समितीत कांद्याच्या दराने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कांद्याची आवक वाढलेली असतानाही सर्वोत्तम प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, सर्वच कांद्याला एवढा भाव मिळालाय का ?

चला जाणून घेऊयात बाजारभाव ! मंडळी, मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या १ हजार २५९ गोण्यांची आवक झाली. त्यात प्रथम क्रमांकाच्या कांद्याला ३ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये, दुसऱ्या क्रमांकाला २ हजार २०० ते ३ हजार ४५० रुपये, तर तिसऱ्या क्रमांकाच्या कांद्याला १ हजार ते २ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गोल्टी कांद्याला १ हजार ५०० ते ३ हजार २००, तर जोड कांद्याला ७०० ते १ हजार ४०० रुपये भाव मिळाला.

दुसरीकडे बाजारात डाळिंबाच्या ३ हजार ५०९ क्रेट्सची आवक झाली. दर्जानुसार डाळिंबाला १० ते ३०५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. संत्र्याला सरासरी २० रुपये, तर सीताफळाला सरासरी ७५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. सोयाबीनला ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button