
अहिल्यानगरमधील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सशी संबंधित तब्बल २२ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. या बहुचर्चित प्रकरणातील केडगावच्या कविता रमाकांत पराळे ऊर्फ मामी आणि इतर आरोपींना पुणे न्यायालयाने अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.
मंडळी, सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींना जाणीवपूर्वक या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा केला. तसेच, या गुन्ह्याशी आरोपींचा थेट संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. महेश तवले, अॅड. सतीश गीते, अॅड. संजय दुशिंग, अॅड. संजय वालेकर, अॅड. प्रकाश सावंत आणि पुण्याचे अॅड. वैभव खेळदकर यांनी आरोपींची बाजू मांडली.
पण, जामीन मिळणे म्हणजे आरोपातून निर्दोष मुक्तता होणे नव्हे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या पुढील कायदेशीर घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





