Latest

पाथर्डीच्या भगर विषबाधा प्रकरणात धक्कादायक खुलासा…भगर म्हणून कोडो मिलिटची विक्री, FDA चा छाप्यात काय समोर आलं?

उपवासाची भगर समजून तुम्हीही कोडो मिलिट तर खात नाही ना? अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने उपवासाच्या पदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

मंडळी, नाशिकच्या एम.सी. उद्योग समूहाच्या कोडो मिलिटची पाथर्डीमध्ये चक्क उपवासाच्या भगरीच्या नावाखाली विक्री होत असल्याचं समोर आलं. अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी छापा टाकून २६ किलो कोडो मिलिट म्हणजे कोद्रा जप्त केला. विशेष म्हणजे, विषबाधा झालेल्या भाविकांनी खरेदी केलेल्या पदार्थाची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दुसरीकडे, अहिल्यानगर शहरातील दाळमंडई परिसरातील एका दुकानातून तब्बल ५३६ किलो भगर जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत एक लाख रुपये आहे. भगरीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा, पाथर्डी आणि राहुरीमध्ये भगरीतून विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे उपवासाचे पदार्थ खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रकरणी आता तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button